माझी ओळख
मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) राज्य उपाध्यक्षा तसेच मीरा भाईंदर उपशहर अध्यक्षा सौ. रेश्मा तपासे यांचा सामाजिक प्रवास सर्वश्रुत आहे. त्यांची समाजाच्या आणि जनसामान्यांच्या समस्या सोडविण्याविषयी असणारी तळमळ यामुळे अगदी कमी वेळात त्यांच्या कार्याची व्याप्ती सर्वधुर पसरली आहे. लोककल्याणाची त्यांची तळमळ आणि मनसेच्या तत्त्वांशी बांधिलकी यामुळे सौ. रेश्मा तपासे या मीरा भाईंदर शहराच्या विकासासाठी एक आदर्श पर्याय आहेत.मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात गेली कित्येक वर्षे नागरिकांना आवश्यक सेवा सुविधांपासून राहावे लागत आहे. याला एकमेव कारण म्हणजे गेली कित्येक वर्षे विकासाच्या मुद्द्यावर जनतेची फसवणूक करणारे, सत्तेचा दुरुपयोग करणारे निर्लज्ज राजकारणी, नेते आणि झोपलेले प्रशासनमी गेली १० वर्षे समाजात सक्रिय राहून नजतेला न्याय देण्यासाठी अनेक आंदोलने, मोहीम हाती घेतल्या आहेत. आता यापुढे राजकारणात प्रभावी पद्धतीने जनतेची कामे करणार आहे.मीरा भाईंदरच्या विकासासाठी मला साथ द्या.
माझे विकासात्मक ध्येय आणि विचार
मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात गेली कित्येक वर्षे नागरिकांना आवश्यक सेवा सुविधांपासून राहावे लागत आहे. याला एकमेव कारण म्हणजे गेली कित्येक वर्षे विकासाच्या मुद्द्यावर जनतेची फसवणूक करणारे, सत्तेचा दुरुपयोग करणारे निर्लज्ज राजकारणी, नेते आणि झोपलेले प्रशासन.
“मला हेच आता बदलायचे आहे.”
सुसज्ज रुग्णालय
मीरा भाईंदर मनपा स्थापन होऊन गेली कित्येक वर्षे झाली तरी अजूनही नागरिकांना आरोग्य विषयक उपचार घेण्यासाठी मुंबईतील हिंदूजा, लीलावती, KEM, इत्यादी रुग्णालयांत जावे लागते. मीरा भाईंदर मध्ये मनपाचे हक्काचे अत्याधुनिक सुसज्ज असे रुग्णालय का नाही?
उच्च दर्जाचे शिक्षण
मीरा भाईंदर मध्ये अजूनही उच्च शिक्षणासाठी सुसज्ज असे कोणतेही महाविद्यालय नाही. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, वित्त क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी मीरा भाईंदर सोडून मुंबई उपनगरे, पुणे, नाशिक, रायगड, इत्यादी ठिकाणी जावे लागत आहे.
प्रशस्त आणि खड्डेमुक्त रस्ते
मीरा भाईंदर मध्ये दरवर्षी खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात, अशा अपघातांमुळे कित्येक नागरिकांनी आपले जीव गमावले आहेत. खड्ड्यांमुळे जनतेच्या कररूपी पैशांची पालिका प्रशासन, भ्रष्ट ठेकेदार आणि निर्लर्ज राजकारणी यांच्याकडून होणारी नासाडी थांबायला हवी.
जीवनावश्यक सुविधा
मीरा भाईंदर मध्ये आजही नागरिक अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे स्वच्छ आणि पुरेसे पाणी मिळत नाही. सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छतेने भरलेली आहेत. हेच आता कुठेतरी बदलायचे आहे.
माझा सामाजिक आणि राजकीय प्रवास
मी गेली १० वर्षे समाजात सक्रिय राहून जनतेला न्याय देण्यासाठी अनेक आंदोलने, मोहीम हाती घेतल्या आहेत. आता यापुढे राजकारणात प्रभावी पद्धतीने जनतेची कामे करणार आहे. मीरा भाईंदर शहरांचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे प्राथमिक आणि अंतिम ध्येय आहे.